श्रीरामपूर रोटरी एज्युकेशन ट्रस्ट संचलित

आमच्याबद्दल

दिव्यांग कल्याण विभाग हा एक सरकारी विभाग आहे जो दिव्यांग नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहे. आमचे ध्येय शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि स्वावलंबनासाठी व्यापक समर्थन प्रदान करणे आहे.

संस्थेची महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • बालवर्ग ते इ. ८ वी पर्यंत पुर्ण शिक्षण मोफत..
  • सामाजिक न्याय विभाग मान्यताप्राप्त, दिव्यांग कल्याण मंत्रालय आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांची अनुज्ञाप्ती प्राप्त संस्था..
  • महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग अंतर्गत राज्यात 'अ' वर्ग दर्जा प्राप्त संस्था.
  • विद्यालयाची सर्व सुविधा युक्त सुसज्ज व भव्य ईमारत.
  • विद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थी-विद्यार्थीनींची स्वतंत्र निवास व्यवस्था.
  • इमारती भोवती सुसज्ज बगीचा, प्रशस्त क्रिडांगण, सर्व प्रकारच्या खेळाचे व व्यायामाचे साहित्य.
  • तज्ञ प्रशिक्षित मान्यताप्राप्त शिक्षकवृंद व अनुभवी सेवाभावी शिक्षकेतर कर्मचारी वृंद.
  • प्रवेशीत प्रत्येक विद्यार्थ्यांची ऑडिओमिटर द्वारे कानाच्या तपासणीची व्यवस्था तसेच मोफत श्रवण यंत्र उपलब्ध…
  • मोफत स्वयंरोजगार व पुनर्वसन मार्गदर्शन केंद्र.
  • विद्यार्थ्यांकरिता संगणक प्रशिक्षणाची व्यवस्था.
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी दरवर्षी कला, क्रिडा, सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग व प्राविण्य.
  • विद्यार्थ्यांकरीता व विद्यार्थीनींकरिता दर्जेदार स्वादिष्ट सकस भोजन व शुध्द पिण्याचे पाणी (आर.ओ. प्रणाली),२४ तास गरम पाणी उपलब्ध…..
  • शाळेचा भव्य तसेच उत्साह वर्धक परिसर
  • २४ तास पहारेकरी उपस्थित
  • मुला - मुलींना सांभाळण्यासाठी स्वतंत्र पुरुष आणि महिला काळजीवाहक…..
  • दर वर्षी सहलीचे आयोजन
  • प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे ऑडिओमीटर द्वारे श्रवण क्षमतेची तपासणी केली जाते..
  • स्पीच थेरेपी सुविधा उपलब्ध आहे.
  • तसेच मोफत श्रवण यंत्र वितरीत करण्यात येतात.